Ad will apear here
Next
शतदा प्रेम करावे..!
आपल्याला भेटणारी माणसे आपल्याला काही ना काही देऊन जात असतात. काही जण कायम लक्षात राहतात. या माणसांच्या आठवणीनेही आनंद मिळत असतो. अशीच काही माणसे सुरेश ठाकूर यांना भेटली आणि ठाकूर यांनी त्यांचे व्यक्तिमत्व, आठवणी शब्दबद्ध केल्या. गावातील ग्रंथपाल काका दळवी यांच्यापासून शब्दचित्रांना सुरुवात होते.

गुरुजन, दाजी, वासूअण्णा, आजाबाबू, गावकरदादा, लक्ष्मणराव वझे अशी माणसे एका पाठोपाठ एक पुस्तकातून भेटीला येतात. उखाणे आबा, दुसरी जन्मदात्री ठरलेली मुक्ताक्का, अशा एका ना अनेक व्यक्तींची ओळख पुस्तकातून होते. दत्तूकाका आणि व्हिजिट फीचे किस्से वाचायला मिळतात. अनेक अनेक किस्से, प्रसंग यांतून ही व्यक्तिमत्वे खुलत जातात.  

प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकातील ‘ते पुलकित दिवस’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQFBI
Similar Posts
ते ‘पुलकित’ दिवस! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरा येथील सुरेश ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘शतदा प्रेम करावे (ती माणसे, ते दिवस)’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. पुण्यातील उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शिक्षक म्हणून सेवा बजावून केंद्रप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या ठाकूर यांनी
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
हुतात्मा गोविंदराव डावरे काळाच्या पडद्याआड गेलेले हुतात्मा क्रांतिवीर गोविंदराव डावरे यांचे कार्य विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. हुतात्मा डावरे यांचे चरित्र सांगताना पुस्तकात प्रारंभी १७२५ ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यानंतरचा भाग गोविंदरावांच्या जन्मापासून सुरू होतो
मराठी सक्तीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा पाठिंबा मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language